Breaking News
मुंबई
बंधुराज लोणे
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले की ब्राम्हण मुख्यमंत्री होतो, असा इतिहास आहे. पुन्हा एकदा हाच अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आला आहे.
राज्यात पहिल्यांदा 1995 मध्ये युतीचे सरकार आले होते .त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा चेहरा बहुजनवादी ठेवायचा प्रयत्न केला होता. नितीन गडकरी नेते होते तरी नेतृत्व मात्र गोपीनाथ मुंडे होते पण 2014 पासून हे चित्र बदलले आहे. आमचा डीएनए ओबीसी आहे असा दावा देवेंद्र फडणवीस करीत असले तरी संधी मिळताच मुख्यमंत्रीपद मात्र ब्राम्हणांकडे देण्यात येते. शिवाय 2014 पासून देशात ज्या प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तिथे मुख्यमंत्रिपद मात्र जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर सेवक असलेल्यांना जास्त संधी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेही कट्टर स्वयंसेवक आहेत.
2014 मध्ये ते मुख्यमंत्री झाले विशेष म्हणजे त्यावेळी ते स्पर्धेतही नव्हते. त्यावेळी ज्येष्ठ असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे वैगेरे नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते.
आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्रे आली आहेत.
रिपोर्टर