Breaking News
प्रतिनिधी
मुंबई
मारकारवाडी
EVM विरोधात जनता रस्त्यावर उतरत असताना आता भारतीय जनता पक्षाचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झेलकरी कामाला लागले आहेत. आज मारकरवाडी जाऊन सदाभाऊ खोत आणि गोविंद पडळकर यांनी सभा घेतली आणि देशातील एक ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून टीका केली.
सोलापूर जिल्ह्यातील या गावाने महायुतीला मिळालेल्या विजयाला आव्हान दिलं असून बॅलेट वर मतदान घेण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला सरकारने दडपशाही करून चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र आता शरद पवार यांनी दिल्लीत आपल्या उमेदवारांची बैठक घेऊन पुढील आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय शरद यांनी घेतला आहे. EVM विरोधी आंदोलनाला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आता भारतीय जनता पक्षाने आपले झेलकरी मैदानात उतरवले आहेत. खोत आणि पडळकर यांनी सभा घेऊन शरद पवार यांना खालच्या भाषेत धारेवर धरले. शरद पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून जनतेला बॅलेट वर निवडणुका नको आहेत , असा दावा या दोघांनी केला. खर तर खोत यांनी ही निवडणूक लढविली नव्हती. त्यांच्या पक्षाला एकही जागा सोडण्यात आली नव्हती, तरीही भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारासाठी हे दोघे किल्ला लढविणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे हे नेहमीचेच धोरण असून अडचणीच्या प्रश्नावर खोत, पडळकर यांना मैदानात उतरवले जाते. भारतीय जनता पक्षाचे मूळ नेते मात्र दुरून मजा बघत असतात. (
(फोटो सौजन्य आयबीएन लोकमत)
रिपोर्टर