Breaking News
माहिसागर
बंधुराज लोणे
या जन्मात कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पाय ठेवणार नाही की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी शपथ गुजरात मधील माहीसागर जिल्ह्यातील लाखो दलित, आदिवासी समाजाने घेतली आहे. 6 डिसेंबर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित स्वाभिमान संमेलनात ही शपथ घेण्यात आली. कॉँग्रेसचे नेते आमदार जीगनेश मेवानी यांनी हे संमेलन आयोजित केले होते.
या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नेहा कुमारी यांनी काही दिवसांपूर्वी दलित आदिवासी समाजाबाबत अपमान जनक वक्तव्य केलं होतं. हिशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी सरकारी कार्यालयात आणि सरकारी कार्यक्रमात केलं होतं. दलित आदिवासी अत्याचाराच्या 90 टक्के घटना या बोगस असतात आणि ब्लॉकमेल करण्यासाठी केल्या जातात, असा दावा नेहा कुमारी यांनी केला होता. याचवेळी त्यांनी एका दलित व्यक्तींकडे बघत तुम्ही अपमान जनक शब्दाचा वापर केला होता. या प्रकरणी नेहा कुमारी यांच्यावर भारतीय प्रशासकीय सेवा नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी मेवानी यांनी केली आहे. नेहा कुमारी यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा अशीही त्यांची मागणी आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांना निवेदन दिले आहे. मात्र या प्रकरणी सरकारने साधी दखलही घेतली नाही अशी मेवानी यांची तक्रार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांनी केवळ अभिवादनासाठी सभा आयोजित केली नाही तर माहिसागर जिल्ह्यातील सोनेला या खेडेगावात स्वाभिमान संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात त्यांनी जमलेल्या लाखो दलित आदिवासी जनतेला ही शपत दिली. आयुष्यात कधीच आर एस एस च्या कार्यक्रमात किवा कार्यालयात पाउल ठेवणार नाही अशी ही प्रतिज्ञा आहे.
......................................
× महापरिनिर्वाण दिनी दलित आदिवासींची शपथ
× आमदार मेवानी यांचे अनोखे आंदोलन
33 जिल्हय़ात घेणार स्वाभिमानी संमेलन
..................................
दरम्यान , गुजरात मधील 33 जिल्हय़ात असेच स्वाभिमानी संमेलन आयोजित करण्याचा घोषणा आमदार मेवानी यांनी केली." मार्जिन न्यूज " सोबत बोलताना त्यांनी गुजरात सरकारचे वाभाडे काढले.
गुजरात मॉडेलचे कितीही धिंडोरा पिटला तरी दलित, आदिवासी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना बाबत गुजरात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर