Breaking News
मुंबई
बंधुराज लोणे
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालीलरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची नोंदणी रद्द होण्याची चिन्हे आहेत. सलग दहा वर्षे निवडणूक न लढणार्या पक्षांची मान्यता, नोंदणी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला विधी आयोगाने दिलेला आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्ष गेल्या तीन निवडणुका लढलेला नाही.
रामदास आठवले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षा सोबत घरोबा केल्या नंतर 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही लोकसभा निवडणुका लढलेल्या नाहीत. या तिन्ही निवडणुकीत रामदास आठवले झेलकरी होऊन भा ज प च्या प्रचारात उतरले. "पाटलांच्या " घराच्या लग्नघाईत आठवले फक्त मिरवत राहिले. या काळात कार्यकर्ते पुढील निवडणुकीची वाट पहात आशेवर दिवस काढत राहिले. या निवडणुकीत रामदास आठवले यांच्या पक्षाला भा ज प ने साधे विचारातही घेतले नाही.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आठवले गटाला 9 जागा देण्यात आल्या होत्या पण अनेक जागांवर भा ज प चे बंडखोर उभे होते. 2019 आणि आता 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आठवले गटाला एकही जागा देण्यात आलेली नाही. 2019 च्या निवडणुकीत आठवले गटाला 5 जागा देण्यात आल्या होत्या पण या जागांवर एकही रिपब्लिकन कार्यकर्ता रिंगणात नव्हता. कारण भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवारही दिले होते आणि हे सर्व कमळ निशाणीवर लढले होते. म्हणजे या निवडणुकीत आठवले गटाचा एकही उमेदवार नव्हता. आता कालिना आणि धारावी असे दोन मतदारसंघ आठवले गटाला शेवटच्या क्षणी सोडण्यात आले पण कालिना येथे एका उत्तर भारतीय तर धारावीत माजी खासदार राहुल शेवाळे याने अमराठी उमेदवार दिला आहे. म्हणजे यावेळी ही आठवले सोबत आयुष्य वेचणारे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणूक रिंगणात नाहीत. लोकसभेच्या सलग तीन निवडणुका आठवले गट लढकेला नाही, त्यामुळे आठवले गटाची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे.
विधी आयोगाने केलेल्या शिफारशीवरून ( नियम 265,/ 2015) नुसार निवडणूक आयोग आठवले गटावर कारवाई करू शकतो.
दरम्यान, आठवलेंच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते प्रचंड निराश आहेत. आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या एस सी एसटी सेलच्या पातळीपर्यंत नेऊन ठेवले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन नावाची अॅलर्जी असून त्यामुळे भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन हे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका होत आहे.
रिपोर्टर