Breaking News
संगमनेर
प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रा. शिवाजी गायकवाड यांच्या " कैलास पर्वत व मानस सरोवर मिश्र संस्कृतीचे दीपस्तंभ" या पुस्तकाचे थाटामाटात प्रकाशन झाले.
शहरातल्या व्यापारी मंडळ सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात हे पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा आणि सध्याच्या काळात हे किती गरजेचे आहे यावर प्रकाश टाकला. रूढ अर्थाने हे पुस्तक प्रवास वर्णन नाही किवा धार्मिक, कर्मकांड याची माहिती नाही तर एका संस्कृतीचा हा एक वेगळाच परिचय करून देण्याच्या प्रयत्न आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती ती प्रा. हेमंत प्रकाश राजोपाध्ये यांची. भारतात विकसित झालेल्या संस्कृती, परंपरा, धार्मिक रुढी आणि त्याचा शेतीशी संबध यावर त्यांनी अतिशय सखोल मांडणी केली. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पत्रकार हेमंत कर्णिक यांनी शिवाजी गायकवाड यांच्या पुस्तकाचे आजच्या काळातील महत्व सांगून या पुस्तकाच्या वेगळेपणावर भाष्य केले. मीनाजबेग रफीकबेग यांनीही सरळ सोप्या मराठीत आपले विचार मांडले. मैत्री पब्लिकेशन्सच्या मोहिनी कारंडे, निशा शिवूरकर
विचारपिठावर उपस्थित होत्या.
मीनल देशमुख, शांताराम गोसावी, सीमा मालाणी , मंगल भावसार, वनिता साबळे , अमित शिंदे, अनिल शिंदे, विनोद भोईर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
रिपोर्टर