सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला सामाजिक न्यायाचे राज्यात वाजले बारा ! देश संतापला असताना आठवले पळाले दुबईला ! आज राजगृह ते चैत्यभूमी मार्च , अमित शहाच्या विरोधात देशभर आंदोलन भाजप झेलकरी खोत, पडळकर मैदानात, पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका EVM विरोधात राज्यभर वणवा पेटला


भारत जोडोचे फडणवीसाना आव्हान

 *भारत जोडो अभियान*

: २० डिसेंबर २०२४*

*नवी दिल्ली*


बंधुराज लोणे 

भारत जोडो अभियान, ही संविधानिक मूल्ये आणि लोकशाही संस्थांचे रक्षण करणारी आणि प्रोत्साहन देणारी नागरिकांची चळवळ आहे. महाराष्ट्रातील नव्या निवडून आलेल्या सरकारने सत्तेत येताच केलेले पहिले काम पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. ते म्हणजे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियम २०२४ नावाचे विधेयक मांडणे, हे संविधानिक मूल्यांना धरून नाही , हा  लोकशाही संस्थांना दुबळे करण्याचा प्रयत्न आहे,

१८ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधिमंडळात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान, या विधेयकाचा वापर राजकीय विरोधक आणि भाजपच्या विचारसरणीच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जाईल, असे संकेत देणारे आहे. हे विधान पाहून दु:ख होते की नव्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्य आणि उपजीविकेच्या महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्याऐवजी सूड उगवण्याला प्राधान्य दिले आहे.

भारत जोडो अभियान, संविधानप्रेमी संस्था आणि नागरिकांसोबत, सत्ताधारी पक्षाविरोधातील प्रत्येक विरोधाला शहरी नक्षलवादी आणि देशद्रोही असे नाव देणे आणि अशा विरोधकांना गप्प करण्यासाठी कठोर कायदे आणणे, हे संविधानाच्या कलम १९ चे उल्लंघन करणारे आहे, 

“असे विशेष कायदे” तयार करून या भूमीतील कायद्यातील प्रक्रियात्मक सुरक्षिततेला बायपास करणे ही प्रवृत्ती गंभीर आहे. अशा कायद्यांचा मुख्य उपयोग म्हणजे गैरवापर. महाराष्ट्रातील नव्या निवडून आलेल्या सरकारला आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की, तुम्ही संविधानामुळे सत्तेत आहात आणि तुम्ही त्याच्या गाभ्यातील मुल्यांशी सुसंगत वागले पाहिजे. “आम्ही लोक” ही फक्त संविधानाची सुरुवात करणारे तीन शब्द नाहीत तर त्याच्या गाभ्यातील आशयाचे रक्षक देखील आहेत.

माननीय राज्यपालांच्या भाषणाच्या उत्तरादरम्यान फडणवीस यांनी भारत जोडो अभियानाचा अनेकदा उल्लेख केला आणि आमच्या कार्यांना देशहिताच्या विरुद्ध असल्याचे ठरवले. हे पहिल्यांदा नाही, त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यानही भारत जोडो अभियानाला लक्ष्य केले होते आणि लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या पराभवाला जबाबदार धरले होते

भारत जोडो अभियान पुन्हा एकदा हे सांगू इच्छिते की, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, श्री. फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाविरोधातील व्यक्तींविरोधात खोटे आरोप करण्याऐवजी, भारत जोडो अभियानाच्या पदाधिकारी आणि सदस्यांविरुद्ध ठोस आरोप आणि पुरावे सादर करावेत. भारत जोडो अभियान हे “माओवादी संघटनांचे फ्रंटल ऑर्गनायझेशन” असल्याचा दावा केल्यावर, त्यांनी अशा संघटनांची यादी सादर करावी आणि ज्या आंतरराष्ट्रीय बैठकींचा त्यांनी उल्लेख केला त्यामध्ये सहभागी झालेल्या भारत जोडो अभियानाच्या सदस्यांची नावे जाहीर करावीत.

महाराष्ट्रातील भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते आणि संघटना, ज्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी अतुलनीय जनचळवळ उभी केली आहे, यांचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही गप्प बसणार नाही किंवा दडपले जाणार नाही आणि संविधानिक मूल्ये आणि लोकशाही संस्थांचे संरक्षण व प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कायदेशीर, शांततामय आणि लोकशाही पद्धतीने काम करत राहू.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट